एकदा वाचा,,,,,,
आज खुपच गर्दी होती बस स्टॉपवर खुपच मोठी लाईन
लागली होती सर्वजन busची वाट पहात
होते.तेवढ्यात
त्याचा थोडा धक्का लागला तिला,ती चिडली आणि रागाने
त्याला ओरडली का रे दिसत नाही का तुला का डोळे
फुटले तुझे?तो सॉरी म्हणाला तिला, पण हिची बडबड
काही केल्या थांबेनाच मग
तोही चिडला आणि म्हणाला,इतका कसला माज आहे गं
तुला?मग आहेच मुळी गर्व मला आहेच
मी इतकी सुंदर....एखादी
... सुंदर मुलगी दिसली की लगेच तुम्ही मुलं
घसरता तिच्यावर....असं बोलुन तिनं तर
त्याच्या स्वाभिमानालाच हात
घातला होता.तोःतुझ्यासारख्या छप्पन
पोरी मी म्हटलं तर उभ्या करु शकतो पण माझा तो मुळ
स्वभाव नाही म्हणुन गप्प आहे
ती~तर तर....
आला मोठा दीडशहाणा मी सर्वांपेक्षा वेगळी मला पटवणं
इतकं सोप्प नाहीये
तो~असं म्हणतेस स्वीकारलं मी चॅलेंज
आजपासुन बरोबर पंधरा दिवसांच्या आत तु मला i love
you म्हणशील आणि तेही ईथेच आजपासुन बरोबर
पंधराव्या दिवशी..... हा माझा विश्वास आहे.असं
म्हणुन तो तिथुन टॅक्सीने निघुन
गेला ती मनातल्या मनात विचार करत
होती की मी काही केल्या याला i love you
कशी आणि का म्हणेन,छे छे वेडा आहे हा.....
कॉलेज मध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात
दिसले त्याबरोबर दोघांनीही एकमेकांकडे पाहुन नाकं
मुरडली दोघांचं एकाच वर्गात अॅडमिशन झालं होतं
त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा पुन्हा दिसु लागले
होते,त्याला पाहील्यावर तिला त्या दिवसाबद्दल
राहुन राहुन वाईट वाटत होतं म्हणुन तिनं ठरवलं
कि त्याला sorry म्हणावं मग क्लासमध्ये
तिची भिरभिरती नजर त्याचा शोधु लागली पण
तो काही दिसला नाही.कदाचित आज तो आला नसेल
असा विचार तिने केला म्हणुन तिने त्याला शोधणं बंद
केलं आणि canteen च्या दिशेने ती चालु
लागली canteenमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे
coffeeघेताना दिसला.मग ती त्याच्या टेबलवर जाऊन
बसली.त्याला थोडं आश्चर्यच वाटलं पण तो शांतपणे
coffee घेत राहीला
ती~i m srry.तो थोडा दचकलाच
पण तिने आणखी एकदा i m srry म्हटलं
तो~wht about?
ती~bus stopवर जे झालं त्याबद्दल
तो~its ok yar i 4give u....coffee
ती~no tnx
मला खरँच तु माफ केलंस ना..मि थोडं जास्तच बोलले
त्यावेळी,इतकं बोलायला नको होतं मी(हात पुढे करुन)
friends....(त्यानेही मोठ्या मनाने
तिच्याशी मैत्री केली)
तो दिवस, बस स्टॉपनंतरचा नंतरचा तिसराच दिवस
होता त्यानंतर ते क्लासमधे ते पुन्हापुन्हा भेटु लागले
एकाच बेंचवर बसु लागले,दिवसागणिक
त्यांची मैत्री वाढु लागली होती.एकमेकांच्य
ा notebook exchange करणं हे तर त्यांचं
घरी येण्याजाण्याचं एक कारणच बनलं
होतं.त्याचा स्वभाव इतका छान
होता की कोणालाही तो आवडावा.समोरच्याला समजुन
घेऊन त्याच्याशी वागणं त्याला मदत
करणं,अडचणीच्या वेळी योग्य तो सपोर्ट करणं
हा त्याचा स्वभावच
होता.दिसायलाही तो बरा होता.त्या दोघांना भेटुन
एक आठवडाच झाला होता की एकमेकांना ते खुपच आवडु
लागले होते,दिवसानंतर दिवस गेले
आज
त्याच्या पहील्या भेटीनंतरचा चौदाव्या दिवसाची रात्र
आहे ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच
बसली होती.ती मनातच म्हणत होती(कधी कळणार रे
तुला माझ्या मनातल्या भावना बघ
ती रात्रीची चाँदणी त्या चंद्राला काय म्हणतीये ते
ऐकना,माझ्या मनातल्या भावना तुला का कळेनात)
रात्रभर असेच विचार राहुन राहुन तिला सतावत
होते,मग ती झोपी गेली।
दुसरा दिवस ऊजाडला तिने ठरवलं होतं
की काही केल्या त्याला prapose
करायचं,आणखी किती दिवस त्याच्यासाठि झुरायचं.तिने
घड्याळाकडे पाहीलं,सकाळचे नऊ वाजलेहोते.घड्याळाकडे
पाहत असताना तिची नजर सहजच कॅलेंडरकडे गेली आज
सव्वीस तारीख होती.तशीच ती sac घेऊन बसस्टॉपकडे
निघाली.थोडं दुर गेल्यावर तिच्या लक्षात आलं कि आज
बसस्टॉपवरच्या पहिल्या भेटी नंतरचा बरोबर
पंधरावा दिवस होता।तिला धक्काच बसला कारण
त्याने तिला दिलेलं ते चॅलेंज आठवलं ज्यानुसार खरंच
पंधराव्या दिवशीच ती त्याला i love u म्हणणार
होती।bus मध्ये बसुन ती कॉलेजला निघाली कॉलेज
पर्यंत जाईपर्यँत तिने निर्णय
घेतला कि काही केल्या आज त्याला i love u म्हणायचं
नाही,कारण त्याने माझा igo hurt होऊ शकतो।
गाडी कॉलेजवरच्या बसस्टॉपवर थांबली,तो तिथेच
हातात गुलाबाचं फुल घेऊन उभा होता,ति गाडीतुन
उतरली.
तीःहे फुल कोणासाठी?....
तोःआहे
कोणासाठी तरी....
तीःमला नाही सांगणार...
तोःते
एक गुपित आहे ते मी तुला उद्या सांगेन plz
आता पुन्हा विचारु नकोस....
तीःठीक आहे
चल...
तोःकुठे....
तीःअरे क्लासमध्ये आणि कुठे....
तोःआज
मी नाही येणार आज माझं थोडं काम आहे तु
जा कॉलेजला....
तीःअरे कसलं काम,काय बोलतोयस
तु...चल ना classमध्ये जाऊया....
तोःअगं PLZ
मला insist करु नको तु जा.....तीःअरे
पण.....
तोःजा म्हटलं ना....
तीःजाते जाते
चिढतो कशाला एवढा.....असं म्हणुन ती वर्गात
गेली,वर्गात तिचं मन लागत नव्हतं,तिला कळुन चुकलं
होतं कि ते तो फुल माझ्यासाठीच घेऊन
उभा होता या आशेवर की मी ते फुल माझ्या हाताने
हक्काने घेईन त्याच्यकडुन आणि त्याला i love u
म्हणेन.तसं करावं असं खुप वाटत होतं तिला, पण राहुन
राहून तिचा igo आड येत होता आणि ते दिलेलं चॅलेंज
तिला सारखं आठवंत होतं।class
सुटला ती कॉलेजच्या बस स्टोपकडे वळली तो तिथेच
उभा होता त्याच्या हातातलं ते फुल सुकलं होतं पण
तो अजुन तसाच हसतमुख वाटत होता तिला वाटत होतं
की तो तेथुन गेला असेल पण त्याला स्टॉपवर बघुन
ती स्तब्ध झाली. दोघांनी एकमेकांकडे पाहीलं तेवढ्यात
बस आली ती गोंधळात होती तिला काही सुचत नव्हते
बस आल्यावर ती बसमध्ये जाऊन बसली।राहुन राहुन
खिडकीतुन ती त्याला आणि तो तिला पाहत होता।
घरात पोहोचल्यावर ती खोल विचारात
गेली होती,वारंवार त्याचे विचार
त्याचा चेहरा तिच्या मनामध्ये रेंगाळत होता अशातच
रात्र झाली, खरँच हा इतकं प्रेम माझ्यावर
करतो,का करतो माझ्यावर प्रेम इतकं?
अशा काही अनुत्तरीत प्रश्नांच्या विचारातच
ती झोपी गेली?
आज एक नवीन दिवस उजाडला,ती आज लवकरच
उठली होती कारण आज तो दिवस
उजाडला होता ज्या दिवसाची ती खुपच आतुरतेने वाट
पाहत होती.सकाळची आंघोळ आवरुन ती आरशासमोर
आली.आरशात बघुन स्वतःशीच म्हणाली,किती वेडेपणाने
प्रेम करतोस रे तु माझ्यावर,खुपच त्रास
दिला ना मी तुला plz माफ कर मला.मनातल्या मनात
ती थोडी खुश होती कारण तो चेलेंज हरला होता.
किती गर्वाने बोलला होता तो मला असा ती विचार
करत हो....तीन.
..े आज ठरवलं कि आज माझ्या मनातल्या सर्व
भावना मी त्याला सांगणार
तो मला किती आवडतो सगळं सगळं मी त्याला सांगेन।
ती खुपच आतुरतेने नऊ वाजण्याची वाट पाहत होती.नऊ
वाजताच ती लगबगीने कॉलेजकडे निघाली,आज आनंदाने
एक वेगळीच स्फुर्ती तिच्यात आली होती,एक वेगळंच हसु
तिच्या ओठाची शोभा वाढवत होती बसस्टॉप
येण्याची खुपच अधीरतेने वाट पाहत होती.तिने
त्याच्यासाठी एक गुलाबाचं फुल घेतलं होतं।तीने i love
u म्हणायची practice ही केली होती.जसजसा बसस्टॉब
जवळ येऊ लागला होता तसतशी तिच्या हृदयाची धडधड
वाढत होती.मघाची अधीरता आता भीतीमध्ये
रुपांतरीत झाली होती.कॉलेजचा बसस्टॉप
आला ती बसमधुन उतरली.तशीच तिथे जाऊन
ती गुलाबाचं फुल घेऊन उभी राहीली जिथे काल
तो उभा होता।एका अनामिक भीतीने
त्याच्या येण्याची वाट बघु लागली.थोड्या वेळाने
तोही आला।आज त्याची sac थोडी जास्तच जड दिसत
होती।तो तिच्याजवळ आला (त्याने तिच्या हातातलं ते
गुलाबाचं फुल पाहीलं नव्हतं)आणि म्हणाला मला माफ कर
मी चेलेंज हरलो तुला पंधरा दिवसांच्या आत
मिळवण्याचं.(ती मनातल्या मनात हसत होती)
पहील्यांदा एक चॅलेंज म्हणुन घेतलं होतं
मी याला पण,नंतर नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करुन
बसलो.मग ठरवलं कि तुला मनातलं सगळं सांगावं,
आणि मला वाटलं की मी या पंधरा दिवसांत पुर्णपणे
ओळखलंय तुला,मला तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम
दिसलं आणि तुही मला तितकीच ओळखतेस असं मला वाटलं
होतं की आणि म्हणुन मी काल ते फुल घेऊन तुझ्यासाठीच
ऊभा होतो।ना की माझं चॅलेंज पुर्ण करण्यासाठी.तु
येशील आणि ते फुल हक्काने माझ्याकडुन मागुन घेशील,तु
आलीस फुलाविषयी चौकशी केलीस आणि माझ्याच
सांगण्याने गेलीस मला वाटलं होतं तु माझ्या मनातलं
ओळखशील।चॅलेंजबद्दल तर मला आज सकाळी लक्षात
आलं,मी आज पुण्याला जातोय तिथंच उरलेलं शिक्षण
घ्यावं म्हणतोय तुला शेवटचं भेटुन जावं.असं मला वाटलं
म्हणुन मी तुला भेटायला आलोय।मी निघतो.... अरे थांब
वेड्या मलाही तुला काही सांगायचं आहे,तु
मला कॉलेजच्या दुसर्या दिवसापासुन आवडु
लागला होतास पण मी तुला सांगु शकले
नव्हते,आणि ज्या दिवशी खरँच सांगावसं वाटलं
त्या दिवशी माझा igo आड आला.हे फुल
मी तुझ्यासाठीच आणलंय तिने हात पुढे करुन त्याला i
love u म्हणलं।तो ते फुल हात पुढे करुन स्वीकारणार
तेवढ्यात,एक मोठी वार्याची झुळुक आली अन
ती भानावर आली।
मी त्या बसस्टॉपच्या शेजारी असलेल्या मेडीकल
स्टोअरमध्ये काम करणारा मुलगा आहे मी रामचंद्र
काकांना(मेडीकल स्टोअरचे मालक)विचारलं होतं की,
काका मी इथे कामाला लागल्यापासुन बघतोय
की,ती मुलगी दररोज त्या बसस्टॉपवर एक गुलाबाचं
फुल घेऊन बरोबर 10 ते5 या वेळेत का उभी असते?
याच्या उत्तरादाखल ते मला या मुलीची कहाणी सांगत
होते।इथपर्यंत तिची प्रेमकहाणी ऐकल्यावर खरोखरच
मला तिच्या प्रेमकहाणीबद्दल असणारी रुची खुपच
वाढली होती,एकदा मी त्या मुलगीकडे एका नजरेनं
पाहीलं आणि पुन्हा रामचंद्र
काकांना उत्सुकतेपोटी विचारलं मग त्या मुलाने तिचं
प्रेम स्वीकारलं
का सांगा ना,सांगा ना काका सांगा ना मी खुपच
अधीर झालो होतो ते म्हणाले.अरे थांब
सांगतो काका सांगु लागलेःतोही ते फुल
स्वीकारण्यासाठी हात पुढे करत होता तेवढ्यात एक
अकल्पित घडलं क्षणार्धात तो तिच्यापासुन खुप लांब
जावुन पडला होता,कारण एका भरधाव येणार्या 4
व्हीलरने त्याला उडवलं होतं.ती हात पुढे करुन तशीच
उभी होती,तिच्या डोळ्यातला एक अश्रु पावसाचं थेंब
जसं आळवाच्या पानावर घरंगळतो तसा तिच्या गालावर
घरंगळत होता,क्षणार्धात त्याचा मृत्यु
झाला होता.त्याला मरुन पाच वर्षे झालीत
पण,
तेव्हापासुन आजपर्यँत
ही मुलगी तिच्या कॉलेजच्या वेळेत 10 ते 5 ईथे
उभी असते फक्त याच आशेवर की तो येईल आणि ती हे फुल
त्याला देऊन त्याला i love u
म्हणेन,आणि तो तिला घेऊन जाईल।
त्या मुलीची कहानी ऐकुन माझी आसवं
दाटली होती,मनात खुपच प्रश्न उभे होते की,खरंच एवढं
प्रेम कोणी करु शकतं का? मी अश्रु पुसले
आणि त्या मुलीकडे बघतच रामचंद्र काकांना विचारलं हे
सर्व तुम्हाला कसं माहीत?तेवढ्यात माझं लक्ष गेलं
की त्या बसस्टॉपवरचा एक पत्रा हालत
होता आणि तो पत्रा तिच्या हाताच्या कोपर्याला येउन
थडकला.त्याने तिच्या हातातलं ते फुल रस्त्यावर जाऊन
पडलं होतं,ते फुल
घेण्यासाठी ती वाकली आणि तिलाही समोरच्या एका ट्रकने
उडवलं... ते मी माझ्या स्वतंच्या डोळ्याने पाहात
होतो।रामचंद्र काकांनी ते पाहाताच
दुकानाच्या काऊंटरवरुन उडी मारुन तिच्याकडे
धावले,मीही त्याच दिशेने धावत गेलो, ते
त्या रक्ताच्या थारोळ्या पडलेले मुलीचे प्रेत
आपल्या मांडीवर घेऊन रडु लागले,मी काही वेळ स्तब्ध
झालो होतो, ते म्हणत
होते,मुली तुझ्या या अभागी बापाला माफ कर
तुझी काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ
शकलो नाही.पण,तुही कुठे माझं ऐकत होतीस तुही फक्त
तुझ्याच मनाचं करत होतीस,कसला वेडेपणा केलीस गं
तु....त्यांच्या या वागण्यानं मला माझ्या सर्व
प्रश्नांची उत्तर मला मिळाली होती.....तेच
त्या मुलीचे आभागी बाप होते.
जर त्या मुलगीने त्या फक्त
त्या एका दिवशी आपला अहंकार बाजुला ठेवुन त्या वाट
पाहणार्या आपल्या प्रियकराला I LOVE YOU हे तीन
शब्द म्हटले असते तर,कदाचित
तो मेला नसता.....कदाचित तिला त्याच्यासाठी पाच
वर्षे अश्रु ढाळत त्या स्टॉपवर वाठ
पाहावी लागली नसती.....कदाचित
तिचा मृत्युही झाला नसता.....आणि कदाचित
त्या तिच्या बापाने तिला गमावलं नसतं......म्हणुनच
तो एक दिवस किती महत्वाचा असतो.
असा एक दिवस प्रत्येक प्रेमीविरांच्या आयुष्यात
येतो त्याला हातचं जाऊ देऊ नका कदाचित तुमचं प्रेम
तुम्हाला मिळेल...

Post a Comment