Jokes

गुरुजी – सांग रे मक्या, पंचवीस भागिले
तीन किती ?
मक्या- गुरुजी, आठ ..!
गुरुजी – शाब्बास..!! आणि बाकी..?
… . . . . . . . . . . . .
मक्या – बाकी….मजेत….!!!
 😂😂😂😂😂😂😂

मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??
सोन्या : निल आर्मस्ट्राँग
मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?
सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!
मास्तरनी खडू चाउन खाल्ला....
 😂😂😂😂😂😂😂

वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्द शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, ""कविता आणि निबंध यातला फरक सांगा...""
""प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध !"", विद्यर्थ्यांने उत्तर दिलं.
शिक्षक अजुन विचार करत आहेत ह्याचे लग्न झालेले नसताना उत्तर बरोबर आल कस... ?
  😂😂😂😂😂😂😂

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........!
😂😂😂😂😂😂😂

शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, 'आळस म्हणजे काय?'
एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
'यालाच म्हणतात आळस.'
 😂😂😂😂😂😂

शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
झंप्या- कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते.....:D :P
 😂😂😂😂😂😂

शिक्षक गण्याला.
शिक्षक:- दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील.
गण्या :- दहा .
शिक्षक :- ते कसे ?
गण्या :- नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.
त्यांचा काय फणस होतील काय मास्तर :D
 😂😂😂😂😂😂

बाई- काय रे गण्या, Homework नाही केलास?
गण्या- काल रविवार होता, Homework आठवलाच नाही.
बाई- फेसबुकवर online व्हायला बरा टाईम मिळाला तुला.
गण्या-(मनातल्या मनात) च्यायला का चुकून हिच्या फोटोला 'लाईक' केलेलं दिसतय वाटत. -
 😂😂😂😂😂😂

 शिक्षक : बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?

चिन्टु : पान नं. १७ ते ४२.
 😂😂😂😂😂😂

  गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू : झेब्रा.
गणपुले सर : असं का बरं?
मंजू : कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना
 😂😂😂😂😂😂


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post