मित्रांनो..... social media.... जरा जपूनच....!

🤔मित्रांनो..... social media.... जरा जपूनच....!

                                          सोसिअल मीडिया हे आजच्या काळाचे प्रभावी आणि सशक्त माध्यम झाले आहे असे सर्वजण म्हणतात. ते खरेही आहे, हे आपण सर्व जण जाणता. त्याची ताकद सत्ता पालटवू शकते तसेच सामाजिक क्रांती घडवू शकते हेही   तितकेच खरे आणि आपण बघितले आहे .
             आपण रोज व्हाट्सअप फेसबुक वर कित्येक चांगले विचार असलेले   मेसेज पाहतो  फॉरवर्डतो. पण फक्त आणि फक्त फॉरवर्ड करतो. माझा हा मेसेज कोणताही ज्ञानाचा डोस पाजण्यासाठीही नाही. तसेच   कोणत्याही राजकीय पक्ष्याची बाजू  घेण्यासाठीाही नाही  हे आधीच  स्पष्ट करतो.
                                           एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि, आपण फक्त कश्याला तरी नावे ठेवण्यास किंवा आपल्याला आवडणाऱ्या पक्ष  किंवा व्यक्तीची वाह वाह करणाऱ्या पोस्ट्स मध्ये फार रस  घेतो , आणि त्या पुढे पाठवतो. अक्षरशा  आपण रोबोटिक झालो आहोत. आपल्या संवेदना  मेल्या आहेत.
                                  फक्त शेअर करायचं  एवढच आपल्याला माहित आहे. आपल्या शेअरमुळे कोणते सामाजिक नुकसान होणार आहे याचा  विचार ना करता फक्त फॉरवर्ड करा. तरच तुम्हाला लाइक्स मिळतील. सगळा कारभार लाईक्स साठी आणि जेवढ्या  जास्त पोस्ट्स तेवढे  तुम्ही ऍक्टिव्ह नाहीतर तुमच्या मध्ये काही दम नाही हि मानसिकता.                                                  
                                     पंतप्रधानांना फेकू आणि विरोधी नेत्याला पप्पू म्हणणारे  मेसेज पाठवण्यामध्ये आपल्याला खूप समाधान मिळते.
               आपण किती हुशार असे आपल्याला वाटते, पण लक्षात घ्या आजचा  पप्पू उद्याचा  फेकू होईल आणि आजचा फेकू उद्या पप्पू होईल आणि हे  सर्व तुम्ही आपणच करणार आहोत.
खरंच देशाबद्दल  प्रेम असेल तर तो पप्पू आहे का फेकू याचा विचार न करता. आपण  काय करू शकतो  याचा विचार करा.
                                              सगळे राजकारणी उन्नीस  बीस  सगळे सारखेच. मग उरतो आपण. आपल्या पोस्ट वरती एक तर फेक मेसेज असतात, त्यामुळे  कोणावर  विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो.
यामुळे  होतंय काय कि खऱ्या  व्यक्ती संस्था  या बद्दल पण संशय  येतो. आणि चांगल्या कामासाठी पण आपण पुढे येत नाही.
                                             आपण टी व्ही वर दाखवलेल्या एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला काहीही न बघता मदत पाठवतो.
पण सोसिअल मेडियावरच्या कोणालाही  मदत करायला घाबरतो. कारण आपण सोसिअल मीडिया तर म्हणतो पण विश्वअसहर्ता शून्य.
 हे होतंय फक्त आपल्या मध्ये असलेल्या असवेन्दन वृत्तींमुळे. कारण आपल्याला  कशाशी  काही देणे घेणे नाही. फक्त निन्दानालस्ती आणि जोक्स या मधेच आपले समाधान.
लक्ष्यात घ्या एकटे  मोदी किंवा राहुल गांधी  किंवा कोणताही पक्ष देश महान बनवू  शकत नाहीत. आधी आपल्याला महान म्हणजे देशप्रेमी नाही, फक्त  संवेदनशील व्हायचे आहे.
आज देशभक्तीची व्याख्या  शिकवली  जातेय. जयहिंद म्हणाला  तर देशभक्त नाहीतर देशद्रोही. माझ्या मते  जो देशाचे संविधान  म्हणजे कायदे पाळतो  त्यावर  विशवास ठेवतो  तो देशप्रेमी, देशभक्त.
म्हणजे जयहिंद  म्हणायचे पण सिग्नलला  थांबायचे नाही, ते तोडण्यामध्ये हुशारी समजायची. ट्राफिक पोलिसांवर रुबाब गाजवायचा , टोल भरताना आपली राजकीय सामाजिक प्रतिष्ठा  20 रुपयांसाठी दाखवायची.
                            गाडी  पार्क  परताना दुसऱ्याचा  विचार करायचा नाही, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी गाडी रस्त्यात  दुसऱ्याला  त्रास  होईल अशी पार्क करायची. आपल्या घरासमोरचा कचरा फक्त पुढे ढकलायचा, आणि परत सोसायटी  साफ  करायला झाडू  हातात घ्यायचा.          
                             समाजसेवेच्या गप्पा मारायच्या पण असा आलेला मेसेज लगेच दृष्टीआड  करायचा. कोण  आहोत आपण ?  खरंच देशप्रेमी का देशद्रोही ? आपण काश्मिरींना  देशद्रोही म्हणतो कारण ते देश्याच्या  संविधानाविरुद्ध  वागतात. मग आपण देशप्रेमी संविधानाचे  पालन का करत नाही ? का आपल्याला फक्त एक सिग्नल  पाळायची  सवय  लावता नाही ? मग जो संविधान  पाळत नाही त्याला काय म्हणायचे ? देश भक्त ?
                फक्त मोठ्या  मोठ्या गोष्टी ￰बोलून, भाषण  देऊन, शेअर करून देश मोठा  होणार नाही. आपली मन, विचार, आचार संवेदनशील   आणि मोठे  झाले तर आणि तरच देश महान मोठा होणार आहे.
आपल्या आजूबाजूच्या  परिसरातील  गरजू  व्यक्ती संस्था   यांची  माहिती ग्रुपवर द्या . त्यासाठी मदत मिळावा , मदत करा. सरकारी  घोषणा  आणि मदतीची वाट न बघता आपला परिसर स्वच्छ  ठेवयाचा प्रयत्न करा, यासाठी  कोणत्याही सरकारी स्वच्छता  अभियानाची  वाट पाहू  नका.
हीच खरी देश सेवा  आणि देशभक्ती. प्रयत्न करा काही बदल करता आला तर आणि  थोडी  देशभक्ती सिद्ध  करता अली तर . नाहीतर करा फॉरवर्ड  नेहमीसारखे .
कृपया हा मेसेज फॉरवर्ड करू नका आचरणात आणायचा  प्रयत्न करा.

राजेंद्र रामचंद्र  चौधरी
चिंचवड, पुणे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post